बातम्या

स्वराज्य संस्थे मार्फत नाधवडे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरओ प्लांट

RO plant for students at Nadhavade High School


By nisha patil - 9/23/2026 9:16:23 PM
Share This News:



स्वराज्य संस्थे मार्फत नाधवडे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरओ प्लांट

CSR निधीतून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा; १२०० आरओ प्लांट उपक्रमांतर्गत वितरण

नाधवडे : विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरातच शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नाधवडे हायस्कूलमध्ये आरओ प्लांट उपलब्ध करून देण्यात आला. स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे यांच्या मंजूर CSR निधीतून कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या १२०० आरओ प्लांट उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

आरओ प्लांटमुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातच शुद्ध पाणी उपलब्ध होणार असून, त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह शैक्षणिक वातावरणावरही सकारात्मक परिणाम होण्यास मदत होणार आहे.

या वेळी राहुल पाटील, विश्वजीत पाटील, आकाश पाटील, प्रकाश पाटील, मुख्याध्यापक ठाकूर सर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

“विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच समाजाची खरी संपत्ती आहे,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. शाळेत आरओ प्लांट उपलब्ध झाल्याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
 


स्वराज्य संस्थे मार्फत नाधवडे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरओ प्लांट
Total Views: 24