राजकीय
RPI ला हक्काच्या जागा मिळाव्यात : रामदास आठवले यांची स्पष्ट भूमिका
By nisha patil - 7/15/2025 12:21:29 PM
Share This News:
RPI ला हक्काच्या जागा मिळाव्यात : रामदास आठवले यांची स्पष्ट भूमिका
रामदास आठवलेंची नाराजी उघड
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत जाऊ नये
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरपीआयला न्याय् प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.यावेळी ते म्हणाले “आम्हाला नेहमीच डावलले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात किमान ३ ते ४ जिल्हा परिषद आणि ८ ते १० पंचायत समित्यांमध्ये जागा मिळाल्या पाहिजेत,” अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.
यासोबत रामदास आठवले यांनी विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. बळजबरीने धर्मांतर करण्याला तीव्र विरोध दर्शवला. “कोणत्याही धर्मात जबरदस्तीने किंवा प्रलोभन देऊन धर्मांतर करणे चुकीचेच आहे. प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य आहे, मात्र त्याचा गैरफायदा होता कामा नये,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
सोलापुरातील संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. याचबरोबर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवावी, असे मत व्यक्त करत आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला की त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचे टाळावे. “राज ठाकरे यांच्या दादागिरीला विरोधच व्हायला हवा. त्यांना दादागिरीला दादागिरीनेच उत्तर द्यावे लागेल. मात्र हिंदी भाषेचाही आदर राखला गेला पाहिजे,” असे ते म्हणाले.
RPI ला हक्काच्या जागा मिळाव्यात : रामदास आठवले यांची स्पष्ट भूमिका
|