खेळ

आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात

RPL 2025 cricket tournament begins with great enthusiasm


By nisha patil - 4/21/2025 12:13:16 AM
Share This News:



आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात

रोटरी क्लब  ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या वतीने आयोजित रोटरी प्रीमियर लीग - आरपीएल २०२५  स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.रणजी खेळाडू उमेश गोटखिंडीकर आणि संग्राम अतीतकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मेरी वेदर मैदानावर दिवस रात्र होणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले आहेत. 

उद्घाटन समारंभ दरम्यान रोटरी चे माजी प्रांतपाल उद्योजक संग्राम पाटील तसेच टी.आर.पाटील, व्यंकटेश बडे, संजय कदम, सचिन परांजपे, निलेश पाटील, डॉ. विलास नाईक, डॉ. संदीप पाटील, अभिजित पाटील  यांच्यासह क्लबचे अध्यक्ष संजय भगत, इव्हेंट चेअरमन रवी मायदेव,  सेक्रेटरी रवी खोत, इव्हेंट को - चेअरमन डॉ.महादेव नरके, रविराज शिंदे, सचिन गाडगीळ,  अभिजीत भोसले ,दाजीबा पाटील , संदीप साळोखे यांच्यासह रोटेरियन आदी उपस्थित होते. 

यावर्षी या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले असून यामध्ये एमडब्ल्यूजी सुपर किंग्स , माई हुंडाई सिद्धिविनायक , कोहिनूर कीर्ती चॅलेंजर्स ,  बडेज लकी लेजंडस , लॉंग लाईफ मोती महल आणि हॉटेल किनारा स्पोर्ट्स या संघांचा समावेश आहे. या संघाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, बेळगाव, हुबळी, रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील ७८ खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. 

आज झालेल्या  पहिल्या सामन्यात  हॉटेल किनारा स्पोर्ट्स ने कोहिनूर कीर्ती संघावर आठ धावांची विजय मिळवला. सामनावीर सचिन हेगडे ठरला.
 एम डब्ल्यू जी सुपर किंग्ज संघाने  माई हुंडाई सिद्धिविनायक संघावर चार गाडी राखून विजय मिळविला. विशाल कल्याणकर सामनावीर ठरला. 
लॉंग लाईफ मोती महल संघाने  कोहिनूर कीर्ती चॅलेंजर संघावर   २३ धावांची विजय मिळवला. सचिन गाडगीळ हे सामनावीर ठरला.
  एमडब्ल्यूजी सुपर किंग्स संघाने बडेज लकी लेजंडस संघावर विजय मिळवला. नामदेव गुरव सामनावीर ठरला.
उद्या या स्पर्धेतील दोन उपांत्य आणि  अंतिम सामना खेळवला जाणार आहेत


आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात
Total Views: 294