बातम्या
जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसचालकांवर RTO ची कारवाई; 8 प्रकरणे उघड
By nisha patil - 9/23/2026 4:37:05 PM
Share This News:
जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसचालकांवर RTO ची कारवाई; 8 प्रकरणे उघड
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकांकडून 13 ते 20 सप्टेंबरदरम्यान खासगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 237 बसेसची तपासणी करण्यात आली असून, 66 वाहने दोषी आढळली, तर 8 वाहनांमध्ये जादा भाडे आकारणीची प्रकरणे निदर्शनास आली.
किणी टोल नाका येथे राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत 190 बसेस तपासण्यात आल्या. यामध्ये 57 वाहने दोषी, तर 2 वाहने जादा भाडे आकारल्याप्रकरणी आढळली. सर्व 237 वाहनांना जादा भाडे न आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रवाशांकडून शासनाने निश्चित केलेल्या कमाल भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्यास तिकीट, वाहन क्रमांक व प्रवासाचा तपशीलासह RTO च्या 9423012134 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा rto.09-mh@mah.gov.in या ई-मेलवर तक्रार करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसचालकांवर RTO ची कारवाई; 8 प्रकरणे उघड
|