विशेष बातम्या
पन्हाळा पोलीस स्टेशन तर्फे दौड
By nisha patil - 10/31/2025 3:10:02 PM
Share This News:
पन्हाळा पोलीस स्टेशन तर्फे दौड
पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर कोल्हापुर जिल्हा पोलीस दल यांच्या मार्गदर्शनाखाली आज पन्हाळा पोलीस स्टेशन तर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त दौड गडावर नियोजन करण्यात आले होते.
.%5B3%5D.jpg)
पन्हाळा शहरातील सर्व नागरिकांना काल सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत यावेळी गडावरील गाईड रिक्षा चालक व व्यावसायिक हजर झाले होते. RUN FOR UNITY या दौड महोत्सवात नागरिकनी उत्स्फूर्तपणे सहभागी नोंदवला.
यासाठी पन्हाळावरील ज्येष्ठ गाईड मुबारक मुत्तवल्ली,संजय कांबळे, शरीफ नगारजी, इत्यादी गाईड व स्थानिक लोक उपस्थित होते . ही दौड सकाळी ७.०० वाजता, प्रवासी कर नाका येथून सुरुवात होऊन सज्जाकोटीपर्यंत चालली. एक दौड देश की एकता और अखंडता के लिए. या ब्रीदवाक्य घेऊन कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने ही दौड घेण्यात आली होती.
.%5B4%5D.jpg)
यावेळी सहा पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर पोलीस उपनिरीक्षक सलीम सनदी गोपनीय पोलीस सुरेश पाटील, पोलीस कर्मचारी निलेश पडवळ,प्रवीण बोरचाटे गणेश पाटील, अजिंक्य जाधव,संतोष देसाई,आशाताई पाटील, पल्लवी यादव, वैशाली राजपाल,उपस्थित होते.
पन्हाळा पोलीस स्टेशन तर्फे दौड
|