बातम्या
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली
By nisha patil - 12/9/2025 4:22:43 PM
Share This News:
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. १२) १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
चार दशकांहून अधिक काळ राजकारण आणि सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या राधाकृष्णन यांनी आरएसएस स्वयंसेवक म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. भाजपचे सचिव, तामिळनाडू अध्यक्ष, खासदार, संसदीय समित्यांवर कामकाज, तसेच कोची येथील कॉयर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
१२ फेब्रुवारी २०२३ रोजी झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर तेलंगणा, पुद्दुचेरी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी १७ ऑगस्ट २०२५ रोजी राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. आज त्यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेऊन औपचारिकपणे कार्यभार स्वीकारला.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली
|