विशेष बातम्या
राधानगरी धरणाचा विसर्ग वाढला; 3100 क्युसेक विसर्ग सुरू, सतर्कतेचा इशारा
By nisha patil - 6/20/2025 6:47:56 PM
Share This News:
राधानगरी धरणाचा विसर्ग वाढला; 3100 क्युसेक विसर्ग सुरू, सतर्कतेचा इशारा
राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय परिणामी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय.आज शुक्रवार, दिनांक २० जून रोजी सकाळी ११.०० वाजता राधानगरी धरणाच्या सेवाद्वारातून सुरू असलेला १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवून १५०० क्युसेक करण्यात आला आहे. तसेच बीओटी (BOT) पॉवर हाऊसमधील विसर्ग देखील वाढवून १६०० क्युसेक करण्यात आला आहे. परिणामी एकूण विसर्ग आता ३१०० क्युसेकवर पोहोचला आहे. ही माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे.
विसर्ग वाढल्यामुळे धरणाखालील भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भोगावती पाटबंधारे विभागामार्फत ही सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे.
राधानगरी धरणाचा विसर्ग वाढला; 3100 क्युसेक विसर्ग सुरू, सतर्कतेचा इशारा
|