बातम्या
राघोबा पाटील मंडळ, रुकडी – नवी कार्यकारिणी जाहीर
By nisha patil - 2/8/2025 2:59:36 PM
Share This News:
राघोबा पाटील मंडळ, रुकडी – नवी कार्यकारिणी जाहीर
सुनील भारमल अध्यक्ष, सम्मेद खानाप्पा उपाध्यक्ष, तर सम्मेद पाटील सेक्रेटरीपदी
रुकडी, ता. हातकणंगले (प्रतिनिधी) – रुकडी गावातील प्रतिष्ठित राघोबा पाटील तालीम मंडळाच्या सन 2025 सालच्या गणेशोत्सवासाठी नवी कार्यकारिणी नुकतीच एकमताने जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये सुनील भारमल यांची अध्यक्षपदी, सम्मेद खानाप्पा यांची उपाध्यक्षपदी, तर सम्मेद पाटील यांची सेक्रेटरी (सचिव) म्हणून निवड करण्यात आली आहे. मंडळाने गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीने मंडळाच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास मंडळाच्या जेष्ठ सदस्यांनी व्यक्त केला आहे.
राघोबा पाटील मंडळ, रुकडी – नवी कार्यकारिणी जाहीर
|