राजकीय

वॉर्ड क्र. 3 मधील रहिमतबी खेडेकर यांची राष्ट्रवादीची उमेदवारी ही अधिकृतच -मुकुंददादा देसाई

Rahimtbi khedekar


By nisha patil - 11/22/2025 10:18:28 PM
Share This News:



वॉर्ड क्र. 3 मधील रहिमतबी खेडेकर यांची राष्ट्रवादीची उमेदवारी ही अधिकृतच -मुकुंददादा देसाई

**आजरा(हसन तकीलदार)*:-आजऱ्याच्या नगरपंचायतीच्या रणधुमाळीमध्ये विरोधी आघाडी करताना बऱ्याच उलथापालथी झाल्या. अखेर तडजोडीत कमी पडल्याने तसेच वरिष्ठ नेत्यांची उदासीनता यामुळे आघाडीत बिघाडी झाली आणि अन्याय निवारण समिती आणि जुनी बीजेपीची मंडळी तसेच इतर नाराज जण मिळून तिसरी आघाडी उदयास आली.

काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट ), शिवसेना(उबाठा), व इतर संघटना यांच्या समन्वयातून आजरा परिवर्तन विकास आघाडीने जन्म घेतला खरा परंतु यात सुद्धा राष्ट्रवादी गटाला विश्वासात घेऊन उमेदवारी जाहीर केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुकुंददादा देसाई यांनी आपल्या विश्वासू शिलेदाराला डावलल्यामुळे नाराजी व्यक्त करीत वॉर्ड क्र. 3 मधील रहिमतबी सलीम खेडेकर यांची उमेदवारी ही राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी असलेबाबत आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले.

आरिफभाई खेडेकर हे सुरवातीपासूनच महाविकास आघाडीबरोबर राहून खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. लोकसभा असो अथवा विधानसभा. प्रत्येक निवडणुकीत आरिफभाई हे महाविकास आघाडी बरोबरच राहिले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी डावलून एका निष्ठावंत आणि एकनिष्ठ कार्यकर्त्याचा अपमान केला असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजरा साखर कारखान्याचे चेअरमन, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख मुकुंददादा देसाई यांनी स्वास्थ्य बरे नसताना सुद्धा स्वतः पुढाकार घेत आरिफभाई यांच्या मातोश्री सौ. रहिमतबी सलीम खेडेकर यांची राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी असून नाम. शरद पवार, नाम. जयंत पाटील, शशिकांत शिंदे, नंदाताई बाभुळकर, व्ही. बी. पाटील या सर्वांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आहे या सर्वांनी वॉर्ड क्र. 3मधील रहिमतबी खेडेकर यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन मुकुंददादा यांनी केले आहे.


वॉर्ड क्र. 3 मधील रहिमतबी खेडेकर यांची राष्ट्रवादीची उमेदवारी ही अधिकृतच -मुकुंददादा देसाई
Total Views: 883