विशेष बातम्या
शहापूरमध्ये श्री राधा-कृष्ण इस्कॉन मंदिराला आमदार डॉ. राहुल आवाडे यांची भेट
By nisha patil - 10/5/2025 3:42:55 PM
Share This News:
शहापूरमध्ये श्री राधा-कृष्ण इस्कॉन मंदिराला आमदार डॉ. राहुल आवाडे यांची भेट
आर. के. नगर, शहापूर येथे उभारल्या जात असलेल्या श्री श्री राधा-कृष्ण इस्कॉन मंदिराच्या कामांना गती मिळत असून, हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात भव्य इस्कॉन मंदिरांपैकी एक ठरणार आहे. या मंदिराच्या कामांची पाहणी व परिसरातील नागरी समस्या जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी नुकतीच या ठिकाणी भेट दिली.
या दौऱ्यात आमदार साहेबांनी मंदिर परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज व गटार व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक नागरिक व भक्तांनी मांडलेल्या अडचणींवर त्यांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित करत, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
यावेळी डॉ. आवाडे म्हणाले, “हे मंदिर भाविकांसाठी केवळ श्रद्धास्थान न राहता, त्यांना अध्यात्मिक उर्जा देणारे केंद्र बनेल. शहापूर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्यासाठी येथील मूलभूत सुविधा सक्षम करणे ही आपली जबाबदारी आहे.”
या दौऱ्यावेळी अनेक स्थानिक मान्यवर व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दादासो भाटले, सचिन हेरवाडे, सतीश पंडित, राजू खोत, रणजीत अनुशे, अरुण केसरे, राजू कबाडे, समीर मुल्ला, शेखर नाईक यांचा सहभाग होता.
या भेटीमुळे नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, मंदिराच्या कामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. आमदार डॉ. आवाडे यांच्या पुढाकारामुळे आर. के. नगर धार्मिक आणि सामाजिक आदर्श ठिकाण म्हणून नावारूपास येईल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला.
शहापूरमध्ये श्री राधा-कृष्ण इस्कॉन मंदिराला आमदार डॉ. राहुल आवाडे यांची भेट
|