शैक्षणिक

डी. वाय. पाटील आर्किटेक्चर, तळसंदेचा राहुल गोडबोले शिवाजी विद्यापीठात प्रथम

Rahul Godbole of Talsande


By nisha patil - 8/20/2025 6:18:31 PM
Share This News:



डी. वाय. पाटील आर्किटेक्चर, तळसंदेचा राहुल गोडबोले शिवाजी विद्यापीठात प्रथम

तळसंदे येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या राहुल नारायण गोडबोले याने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादी प्रथम क्रमांक मिळवत देदीप्यमान यश मिळवले आहे.  महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी या  विद्यापीठ गुणवत्ता यादीत ‘टॉप – १०’ मध्ये येण्याचा बहुमान मिळवला आहे.

शिवाजी विद्यापीठातर्फे एप्रिल / मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष आर्कीटेक्चर पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.  डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या राहुल नारायण गोडबोले याने ८.५० सीजीपीएसह विद्यापीठ  गुणवत्ता यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. तर  याचा महाविद्यालयाच्या गायत्री अनिल संतीकर हिने द्वितिय क्रमांक मिळवला आहे. सई बाबासो माने-पाटील (पाचवा), मिथीला महेश जगताप (सहावा), कृणाल प्रकाश चव्हाण (आठवा) व  वैष्णवी पंढरीनाथ पाटील(दहावा) यांनी ‘टॉप – १०’मध्ये स्थान मिळवले आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त  ऋतुराज पाटील,  पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्रभारी प्राचार्य तेजस पिंगळे, प्रा. रविंद्र सावंत,  आसावरी पाढरपट्टे, दिग्विजय पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


डी. वाय. पाटील आर्किटेक्चर, तळसंदेचा राहुल गोडबोले शिवाजी विद्यापीठात प्रथम
Total Views: 58