बातम्या
राहुल पाटील व राजेश पाटील यांचा आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
By nisha patil - 8/25/2025 3:38:43 PM
Share This News:
राहुल पाटील व राजेश पाटील यांचा आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
सडोली खालसा, दि.२४ : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील या बंधूसह दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटील गटातील सर्व कार्यकर्त्यांचा सोमवारी (दि.२५) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सडोली खालसा येथे भेट देऊन सभास्थळ व कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. त्यांनी सांगितले की या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, गोकुळचे संचालक युवराज पाटील, बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल पाटील व राजेश पाटील यांचा आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
|