बातम्या

आमदार डॉ. राहुल आवाडे व इमरान डबेदार यांच्या वाढदिवसानिमित्त बोअरवेल बसवून सामाजिक कार्य

Rahul awade emran dbedar

By nisha patil - 9/26/2025 3:29:00 PM
Share This News:

आमदार डॉ. राहुल आवाडे व इमरान डबेदार यांच्या वाढदिवसानिमित्त बोअरवेल बसवून सामाजिक कार्य

शहापूर कारंडे मळा, गल्ली क्र. ६ येथे आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब व इमरान डबेदार यांच्या वाढदिवसानिमित्त इमरान डबेदार यांच्या मार्फत बोअरवेल बसविण्यात आली. या बोअरवेलचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले

या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईतून मोठा दिलासा मिळणार असून समाजहिताचे हे कार्य कौतुकास्पद ठरले. या प्रसंगी मान्यवर, नागरिक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार डॉ. राहुल आवाडे व इमरान डबेदार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
 
नागरिकांनी वाढदिवसानिमित्त दोघांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व समाजकार्यासाठी अधिक ऊर्जा लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.

आमदार डॉ. राहुल आवाडे व इमरान डबेदार यांच्या वाढदिवसानिमित्त बोअरवेल बसवून सामाजिक कार्य
Total Views: 56