बातम्या
जवाहरनगर इचलकरंजीत आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते स्वामी समर्थ आरती
By nisha patil - 9/26/2025 3:31:56 PM
Share This News:
जवाहरनगर इचलकरंजीत आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते स्वामी समर्थ आरती
श्री स्वामी समर्थ केंद्र, गणपती कट्टा, जवाहरनगर, इचलकरंजी येथे धार्मिक वातावरणात आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभहस्ते आरतीचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
केंद्रात दररोज होणाऱ्या धार्मिक उपक्रमांत आमदार साहेब सहभागी झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आरतीनंतर भाविकांनी आमदार साहेबांचे स्वागत करून त्यांना आशीर्वाद दिला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांनी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या आरोग्य, सुख-समृद्धी व कल्याणासाठी मंगलकामना व्यक्त केल्या.
जवाहरनगर इचलकरंजीत आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते स्वामी समर्थ आरती
|