बातम्या

मार्केट यार्डमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; १४ जणांवर कारवाई

Raid on gambling den in Market Yard


By nisha patil - 11/18/2025 3:30:09 PM
Share This News:



मार्केट यार्डमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; १४ जणांवर कारवाई, 

२.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मार्केट यार्ड परिसरातील राजीव गांधी वसाहतीतील जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी तब्बल चौदा जणांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह एकूण २ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली असून, याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

कारवाईत अटक झालेल्यांत सतीश बाजीराव जाधव, श्रीशैल शरनापा आडके, चेतन बंडू कुराडे, शिवकुमार चंद्रशेखर इंडी, मल्लिकार्जुन बसलिंगाप्पा रामपूर, बसवराज शिवराय नायकवडी, मुजाहीद गौसलाजम चमनशेख, चिदानंद विरुपाक्ष बहीरजी, अमोल रमेश गोंधळी, मल्लिकार्जुन शरनापा रायगोंडा, आसगरआली ताजुद्दीन शेख, धर्मा दौलू कांबळे, मुसद्दीक मोहमंदहानिफ मुजावर, उमेश बाजीराव जाधव यांचा समावेश आहे. सर्वांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आले.

पोलिस निरीक्षक दत्तात्रय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील अंमलदार मयूर देसाई, समीर पवार, पंकज कारंडे, प्रवीण पवार, माधुरी माळी, अविनाश काळेल, वैष्णवी महारनवर यांनी ही धाड यशस्वीपणे पार पाडली


मार्केट यार्डमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; १४ जणांवर कारवाई
Total Views: 36