विशेष बातम्या
"पावसाची सरासरी ओलांडली, विसर्ग वाढला – कोल्हापूर जिल्हा सतर्कतेच्या स्थितीत!"
By nisha patil - 6/16/2025 3:37:12 PM
Share This News:
"पावसाची सरासरी ओलांडली, विसर्ग वाढला – कोल्हापूर जिल्हा सतर्कतेच्या स्थितीत!"
जिल्ह्यातील सात तालुक्यांनी जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज दुपारी 1 वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जाहीर केला आहे.
दरम्यान, कोल्हापूर–गगनबावडा मार्गावरील करुळ घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी आज सकाळी 2 फूटांनी वाढली असून, रुई आणि इचलकरंजी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच कुंभी नदीवरील सांगशी बंधाराही जलमय झाला आहे.
राधानगरी धरणात 54.71 टक्के जलसाठा नोंदवला गेला असून, धरणाचा विसर्ग वाढवून 2500 क्युसेक करण्यात आला आहे. कुंभी मध्यम प्रकल्पातील विद्युतगृहातूनही 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीच्या जलपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
"पावसाची सरासरी ओलांडली, विसर्ग वाढला – कोल्हापूर जिल्हा सतर्कतेच्या स्थितीत!"
|