बातम्या

राज ठाकरे ‘वर्षा’वर; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत तब्बल अर्ध्या तासाहून अधिक चर्चा

Raj Thackeray on Varsha


By nisha patil - 8/21/2025 4:16:32 PM
Share This News:



राज ठाकरे ‘वर्षा’वर; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत तब्बल अर्ध्या तासाहून अधिक चर्चा

 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे समीकरण? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने नवे राजकीय समीकरणं तयार होणार का, याविषयी चर्चांना उधाण आले आहे.

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यानंतर ही भेट अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. नागरी समस्यांसंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या बैठकीचे अजेंडा अद्याप गुलदस्त्यात आहे.

राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात सुमारे अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी अलीकडच्या काळात राज ठाकरेंची झालेली जवळीक लक्षात घेता, ही भेट कोणाला इशारा देण्यासाठी आहे का, यावरही राजकीय वर्तुळात चर्चेची जोरदार लगबग सुरू आहे.


राज ठाकरे ‘वर्षा’वर; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत तब्बल अर्ध्या तासाहून अधिक चर्चा
Total Views: 88