बातम्या

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गात सामाजिक उपक्रम...

Raj thakare birthday


By nisha patil - 6/14/2026 9:59:07 PM
Share This News:



राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गात सामाजिक उपक्रम...

दोडामार्ग, गवस शुभम : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुक्यात मनसेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी दोडामार्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तसेच रुग्णालय परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कल्पवृक्षाचे रोप लावण्यात आले.

या प्रसंगी रुग्णांनी राज ठाकरे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये माजी उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावंकर, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, तालुकाध्यक्ष विनायक सावंत, तालुका सचिव संदीप गवस, अक्षय कुबल, मुकुंद परब, नितीन देसाई, नवलू झोरे, बापू गावडे, अर्जुन धुरी आदींचा सहभाग होता.

सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.


राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गात सामाजिक उपक्रम...
Total Views: 8