बातम्या
राज ठाकरे यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून कोल्हापुरात वृक्षारोपण, अभिषेक व स्वस्त दरात पेट्रोल वाटप
By nisha patil - 6/14/2026 10:03:40 PM
Share This News:
राज ठाकरे यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून कोल्हापुरात वृक्षारोपण, अभिषेक व स्वस्त दरात पेट्रोल वाटप
हिंदू जननायक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक Raj Thackeray यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर शहर जिल्ह्याच्या वतीने विविध विधायक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पहाटे करवीर निवासिनी Mahalaxmi Temple येथे राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर 580 वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ आनंदराव दिंडोर्ले सांस्कृतिक भवन, साने गुरुजी वसाहत येथून करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त नागरिकांना दिलासा देणारा उपक्रम म्हणून भाऊजी टॉकीज येथील प्रशांत पेट्रोल पंप आणि साळुंखे नगर येथील कोंडुस्कर ऑटो सेंटर पेट्रोल पंप येथे दिवसभर पेट्रोल प्रति लिटर पाच रुपये कमी दराने उपलब्ध करून देण्यात आले.
या उपक्रमांप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह विजय करजगार, अभिजित पाटील, संजय चौगले, निलेश आजगावकर, निलेश धुम्मा, अभिजित राऊत, सागर साळोखे, अरविंद कांबळे, राजन हुल्लोळी, उत्तम वंदुरे, रणजित वरेकर, महेश पाटील, सुनिल तुपे, मोहसिन मुल्लानी, अजिंक्य शिंदे, दिलीप पाटील, राहुल खाडे, गणेश शिंदे, विशाल कांबळे, अमित साळुंखे, अनिकेत निकम, रत्नदीप चोपडे, आदित्य सुतार, दीपक पाटील, यतीन होरणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून कोल्हापुरात वृक्षारोपण, अभिषेक व स्वस्त दरात पेट्रोल वाटप
|