शैक्षणिक
एस. एम. माळी यांना जीवनगौरव तर अशोक राजाराम माळी यांना समाजभूषण पुरस्कार
By nisha patil - 4/12/2025 12:47:15 PM
Share This News:
कोल्हापूर लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार हुपरी येथील चांदी उद्योजक एस. एम. माळी यांना तर समाजभूषण पुरस्कार निवृत्त सैनिक दुय्यम अधिकारी भारतीय सेनेचे अशोक राजाराम माळी यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय वधू- वर व समाज मेळाव्यात करण्यात येणार आहे. राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह येथे सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
पुरस्काराचे वितरण राज्याचे आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, अखिल भारतीय समाज उन्नती परिषदेचे अध्यक्ष विजयराव धुळूबुळू, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष किरण गवळी, उद्योजक अमोल राजमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याच्या तयारीसाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यामध्ये मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी, उपाध्यक्ष अनिल माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी, ज्येष्ठ संचालक तानाजी माळी, काशिनाथ माळी, सचिव राजाराम यादव, खजानिस किशोर माळी, अशोक माळी, शशिकांत माळी, बाळासाहेब माळी, राजू माळी, दयानंद माळी, महेश माळी, संतोष माळी सर, संजू कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन समाजाचे जिल्हाध्यक्ष गुरुबाळ माळी व महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती वंदना माळी यांनी केले आहे.
एस. एम. माळी यांना जीवनगौरव तर अशोक राजाराम माळी यांना समाजभूषण पुरस्कार
|