बातम्या
राजारामपुरी पोलीसांची धडाकेबाज कारवाई — गांजा विक्री करणाऱ्या युवकास अटक
By nisha patil - 10/27/2025 3:07:25 PM
Share This News:
राजारामपुरी पोलीसांची धडाकेबाज कारवाई — गांजा विक्री करणाऱ्या युवकास अटक
कोल्हापूर, दि. 27 ऑक्टोबर: राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने शेंडा पार्क ते आर. के. नगर रोडवर छापा टाकून मयुर मोतीलाल मिणेकर (वय 24, रा. पाचगाव) यास गांजा विक्री करताना रंगेहात पकडले.
त्याच्याकडून 1 किलो 267 ग्रॅम गांजा आणि मोबाईल फोन असा एकूण ₹38,675/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा सॅकमध्ये गांजा ठेवून विक्रीसाठी थांबलेला असताना पोलिसांनी छापा टाकला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे व त्यांच्या पथकाने केली. गुन्हा अंमली पदार्थ अधिनियम कलम 8(क), 20(ब)(ii)(ब) अंतर्गत दाखल असून पुढील तपास साळुंखे करीत आहेत.
राजारामपुरी पोलीसांची धडाकेबाज कारवाई — गांजा विक्री करणाऱ्या युवकास अटक
|