बातम्या

राजारामपुरी पोलिसांची मोठी कारवाई! क्रेटा कारमधून ८.८५ लाखांचा अवैध दारूचा साठा जप्त

Rajarampuri polices big action


By nisha patil - 1/11/2025 2:42:04 PM
Share This News:



राजारामपुरी पोलिसांची मोठी कारवाई! क्रेटा कारमधून ८.८५ लाखांचा अवैध दारूचा साठा जप्त
 

एक जण अटकेत; विदेशी दारूसह क्रेटा वाहन जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी): राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत ८ लाख ८५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात विदेशी दारूचा साठा तसेच गुन्ह्यात वापरलेली ह्युंडाई कंपनीची क्रेटा कारचा समावेश आहे. ही कारवाई दि. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ वाजता सायबर चौक ते केएसबीपी चौक मार्गावर करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे राजारामपुरी पोलिसांनी सापळा रचून क्रेटा कार अडवली. तपासात वाहनातून २ लाख ८५ हजार १४० रुपयांची विदेशी दारू आणि ६ लाख रुपये किंमतीची क्रेटा कार असा एकूण ८ लाख ८५ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

या प्रकरणी प्रथमेश यशवंत पाटील (वय २३, रा. गोकुळ शिरगाव, प्रिती हॉटेल मागे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई मा. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक बी. धीरजकुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत पो.उपनिरीक्षक सचिन चंदन, पो.हे.कॉ. अमोल पाटील, कृष्णात पाटील, तसेच पोलीस कर्मचारी सचिन पाटील, संदीप सावंत, सत्यजीत सावंत, विशाल शिरगावकर, सुशांत तळप यांनी सहभाग घेतला.

या घटनेत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. अमोल पाटील करत आहेत.


राजारामपुरी पोलिसांची मोठी कारवाई! क्रेटा कारमधून ८.८५ लाखांचा अवैध दारूचा साठा जप्त
Total Views: 42