बातम्या
राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालय विकासकामांना गती
By nisha patil - 4/29/2025 12:19:03 AM
Share This News:
राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालय विकासकामांना गती
कोल्हापूर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालय परिसरातील सर्व विकासकामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
नूतनीकृत सीपीआर रुग्णालयाचे लोकार्पण येत्या दिवाळीपूर्वी होण्यासाठी नियोजनबद्ध कामांवर भर देण्यात येणार आहे.
रस्ते, वसतिगृहे, प्रशिक्षण केंद्रे, रुग्णालये व इतर सुविधा जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
शासकीय बैठकीत अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालय विकासकामांना गती
|