बातम्या

कोल्हापुरात सजवलेल्या म्हशींचा रोड शो – राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती

Rajesh Kshirsagar 1


By nisha patil - 10/22/2025 11:50:32 PM
Share This News:



कोल्हापुरात सजवलेल्या म्हशींचा रोड शो – राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती

कोल्हापूर, दि. २२ :दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापुरात गवळी समाज बांधवांकडून सजवलेल्या म्हशींचा आकर्षक रोड शो काढण्यात आला. बळीराजाला, गवळी समाज बांधवांना आणि म्हैस धारकांना साथ देणाऱ्या म्हशी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या अनोख्या उपक्रमाला आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट देत सहभाग घेतला. त्यांनी पंचगंगा नदी परिसरात गवळी समाज बांधव आणि म्हैस धारकांच्या आनंदोत्सवात सहभागी होत त्यांना दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

जनावर म्हणजे फक्त उपयोगी प्राणी नसून ते आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, या जाणिवेतून म्हशींना साज-शृंगार करून रंगीत सजावट करण्यात आली. फुलांच्या माळा, झगमगत्या वस्त्रांमध्ये सजलेल्या म्हशींनी परिसरात उत्सवी वातावरण निर्माण केले.

यावेळी यामाहा मोटारसायकलवरून म्हैस पळवण्याचा थरारक अनुभवही घेण्यात आला. पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संगम साधणारा हा उपक्रम कोल्हापुरातील पाडव्याचा एक वेगळा ठसा उमटवणारा ठरला.


कोल्हापुरात सजवलेल्या म्हशींचा रोड शो – राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती
Total Views: 86