बातम्या
.राजेश क्षीरसागरांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी गाजला; २१ दिंड्यांना टाळ-मृदंग!
By nisha patil - 11/25/2026 3:51:56 PM
Share This News:
.राजेश क्षीरसागरांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी गाजला; २१ दिंड्यांना टाळ-मृदंग!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि लोकसेवेचा वसा अखंडितपणे पुढे सुरू ठेवणार, असा निर्धार आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील २१ दिंड्यांना टाळ-मृदंगाचे वाटप करण्यात आले. तसेच पांजरपोळ येथील गोमातेस चारा व पशुखाद्य, गरजू आणि निराधार नागरिकांना ब्लँकेट, अंध विद्यार्थ्यांना उबदार कपडे, अनाथ मुलांना जीवनावश्यक साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले.
याशिवाय रुग्णांसाठी मदत, मोफत नेत्रतपासणी, नवजात बालकांना बेबी किट आणि कुष्ठधाम येथील रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे उपक्रमही राबविण्यात आले.
शनिवार पेठेतील शिवालय कार्यालयात आमदार क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी औक्षण आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच आपली खरी ताकद असून, विकासकामे आणि समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
.राजेश क्षीरसागरांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी गाजला; २१ दिंड्यांना टाळ-मृदंग!
|