राजकीय

रंकाळ्याचे सौंदर्य टिकवणे ही सर्वांची जबाबदारी – आमदार राजेश क्षीरसागर

Rajesh kshirsagar a


By nisha patil - 12/10/2025 9:50:47 PM
Share This News:



रंकाळ्याचे सौंदर्य टिकवणे ही सर्वांची जबाबदारी – आमदार राजेश क्षीरसागर

फेरीवाल्यांना शिस्त पाळण्याच्या, अधिकाऱ्यांना अन्यायकारक कारवाई टाळण्याच्या सूचना

कोल्हापूर, दि. १२ :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने रंकाळा तलावाचे सौंदर्य वाढले असून येथे वाढत्या गर्दीमुळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी संध्यामठ परिसरास भेट देऊन फेरीवाले आणि अधिकारी यांच्यात समन्वय घडवून आणला.

ते म्हणाले, “रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. फेरीवाल्यांनी शिस्त पाळून व्यवसाय करावा आणि अधिकाऱ्यांनीही अन्यायकारक कारवाई टाळावी.”

रंकाळ्यातील कचरा, वाहतुकीची कोंडी, आणि पार्किंग समस्यांबाबत नागरिकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

या वेळी शिवसेना पदाधिकारी, महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.


रंकाळ्याचे सौंदर्य टिकवणे ही सर्वांची जबाबदारी – आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 41