बातम्या
बच्चू कडूंच्या वक्तव्यावर इतिहासप्रेमींचा संताप; राजेशिर्के वंशजांचा निषेध
By nisha patil - 10/24/2025 2:48:44 PM
Share This News:
बच्चू कडूंच्या वक्तव्यावर इतिहासप्रेमींचा संताप; राजेशिर्के वंशजांचा निषेध
पुणे (प्रतिनिधी): पातुर्डा (जि. बुलढाणा) येथे झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत माजी आमदार बच्चू कडू यांनी “छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूस त्यांचे सासरे श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के जबाबदार असून औरंगजेब नाहक बदनाम झाला” असे वक्तव्य केल्याने राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.
शिव-शंभुभक्त, इतिहासप्रेमी तसेच राजेशिर्के वंशज घराण्यांकडून या विधानाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूस औरंगजेबासह स्वराज्यभेदी कारभारी मंडळी जबाबदार असल्याचे इतिहास सांगतो, असे शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के यांनी स्पष्ट केले.
बच्चू कडूंनी राजकारणात भूमिका घ्यावी, पण इतिहासाचे विकृतीकरण करू नये, अशी मागणी त्यांनी केली. तसेच २८ ऑक्टोबर रोजीच्या नागपूर शेतकरी आंदोलनापूर्वी बच्चू कडूंनी माफी मागावी, अन्यथा राज्यस्तरीय राजेशिर्के घराणे निषेध आंदोलनाचा निर्णय घेईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
बच्चू कडूंच्या वक्तव्यावर इतिहासप्रेमींचा संताप; राजेशिर्के वंशजांचा निषेध
|