बातम्या
राजमाता मल्टीस्टेट आजरा शाखेचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात*
By nisha patil - 2/5/2026 5:05:40 PM
Share This News:
**राजमाता मल्टीस्टेट आजरा शाखेचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात*
आजरा(हसन तकीलदार)*:-राजमाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., शाखा आजरा यांचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी सैनिक, माजी शिक्षक, उद्योजक तसेच शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायण पूजनाने तसेच झाडाला पाणी घालून पर्यावरणपूरक उपक्रमातून करण्यात आले . या प्रसंगी मुख्य कार्यालयाकडून संचालक तुकाराम कृष्णा कोळी , संजय बाबुराव सावंत तसेच सल्लागार पांडुरंग गणपती सावरतकर उपस्थित होते. तसेच आजरा शाखेतील सर्व कर्मचारी वर्गही कार्यक्रमात सहभागी झाला होता.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आजरा शाखेतील कर्मचारी वर्गाने केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर व उपस्थित सभासदांचा सत्कार करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वृषाली वाळके यांनी उत्कृष्टरीत्या केले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
राजमाता मल्टीस्टेट आजरा शाखेचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात*
|