बातम्या
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आजऱ्यात वृक्षारोपण कार्यक्रम
By nisha patil - 6/15/2026 8:10:50 PM
Share This News:
*" राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आजऱ्यात वृक्षारोपण कार्यक्रम*
**आजरा(हसन तकीलदार)*:-राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आजरा यांचेकडून वनरक्षक अधिकारी कृष्णा डेळेकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम राबवून निसर्ग संवर्धनचा संदेश देण्यात आला.
राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून पर्यावरणचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता पर्यावरण संवर्धन पूरक कार्यक्रम राबवण्याचे स्पष्ट केले होते.त्यानुसार आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन वृक्षारोपण केले त्याच बरोबर शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे
मनसे तालुका अध्यक्ष आनंदा घंटे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
यावेळी सुशांत पोवार(तालुका उपाध्यक्ष)
सौ. सरिता सावंत(जिल्हा उपाध्यक्षा)
यश सुतार, विनायक घंटे,मयूर हरळकर,वसंत घाटगे,सागर खोत,वसंत सावंत,सुनील पाटील,चंद्रकांत इंगळे,
सौ. संगीता राठोड(वनविभाग कर्मचारी),कुंडलिक शिंदे, मधुकर दोरुगडे (वनसेवक),वन्यजी बचाव पथक - अक्षय पाटील,साहिल डेळेकर, समीर केरकर, सौरभ कोंडूस्कर, विनू पताडे आदिजण
उपस्थित होते.
-: सन्माननीय राजसाहेब ह्यांच्या आदेशानुसार वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून पर्यावरणचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता पर्यावरण संवर्धन पूरक कार्यक्रम राबवण्याचे स्पष्ट केले होते.
तसेच मनसे आजरा ता. अध्यक्ष *श्री. आनंदा घंटे* यांचे कडून *शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय* कार्यक्रम राबवण्यात येणार असलेचे सांगण्यात आले
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आजऱ्यात वृक्षारोपण कार्यक्रम
|