बातम्या
ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कारखानदारांसोबत खलबतं!
By nisha patil - 10/24/2026 10:27:35 PM
Share This News:
ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कारखानदारांसोबत खलबतं!
कोल्हापुरात ऊस दराचा तिढा सुटणार का? शेतकऱ्यांना यंदा पहिली उचल किती मिळणार? याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलंय! रखडलेला ऊस दर आणि गळीत हंगामाची कोंडी फोडण्यासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि साखर कारखानदारांचे प्रतिनिधी आमनेसामने आले.
साखरेचं किमान विक्री मूल्य म्हणजेच एमएसपी प्रतिकिलो ५० रुपये करण्याची मागणी, साखरेच्या बाजारभावाचं गणित आणि कारखान्यांची आर्थिक स्थिती यावर चर्चा झाली. वाढलेला उत्पादन खर्च, उसाचा घटलेला उतारा आणि वजनातील घट लक्षात घेऊन यंदा शेतकऱ्यांना घसघशीत पहिली उचल जाहीर करा, अशी आग्रही मागणी राजू शेट्टी यांनी केली.
दरम्यान, कर्नाटकातील २६ तारखेच्या बैठकीतील निर्णयाकडेही सीमाभागातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. एकीकडे ऊस दराचा प्रश्न कायम, तर दुसरीकडे उपसाबंदी आणि नदीपात्रे कोरडी पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय.
ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कारखानदारांसोबत खलबतं!
|