बातम्या
राजू शेट्टींचा एल्गार! कोगनोळी टोलनाक्यावर शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन!
By nisha patil - 10/13/2026 2:59:40 PM
Share This News:
राजू शेट्टींचा एल्गार! कोगनोळी टोलनाक्यावर शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन!
साखरेचा किमान हमीभाव वाढवा, इथेनॉलला योग्य दर द्या; अन्यथा महामार्ग खुला होणार नाही! असा थेट इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. नवी दिल्लीत केंद्र सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज सकाळी अकरा वाजल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाका आणि कर्नाटकातील हत्तरकी टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलिसांनी वाहने पर्यायी आणि अंतर्गत मार्गांनी वळवली आहेत.साखरेचा किमान हमीभाव प्रतिकिलो ५० रुपये करावा, सी-हेव्ही इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा आणि लवकर साखर हंगाम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.दरम्यान, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या जेवणासाठी कागल आणि निपाणी परिसरातील गावांमधून भाकरी आणि पिठल्याचे संकलन सुरू आहे.
त्यामुळे टोलनाक्यांवर आंदोलनस्थळाला छावणीचे स्वरूप आले आहे.
केंद्र सरकारने मागण्यांबाबत लेखी निर्णय जाहीर केल्याशिवाय महामार्ग मोकळा करणार नाही, असा ठाम इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. आता केंद्र सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेणार आणि महामार्गावरील वाहतूक कधी सुरळीत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.a
राजू शेट्टींचा एल्गार! कोगनोळी टोलनाक्यावर शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन!
|