राजकीय

राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा: शेतकऱ्यांसाठी धोरणे अपयशी

Raju Shetty targets government


By nisha patil - 8/12/2025 12:03:20 PM
Share This News:



 शहादा (नंदुरबार) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याने शेती व्यवसाय अधोगतीकडे जात असून, मुठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी चुकीची धोरणे राबवली जात आहेत. अतिवृष्टी, महापूर आणि नैसर्गिक संकटांत शेतकरी कोलमडला असताना सरकार दररोज होणाऱ्या ८ शेतकरी आत्महत्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

नागपूर अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या वेदना लक्षात घ्याव्यात, असेही त्यांनी विधानभवनातील पायऱ्यांवर माथा टेकण्याचे प्रतीकात्मक आवाहन करून सांगितले. आदिवासी जिल्ह्यातील कापूस, तूर, मका, सोयाबीन आदी पिकांच्या घसरलेल्या अर्थकारणाचीही शेट्टींनी जाणीव करून दिली.

या मेळाव्यात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे शेतकरी नेते घनश्याम चौधरी यांनी शिवसेनेला रामराम ठोकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. कार्यक्रमास किशोर ढगे, अनिल पवार, अमर कदम, बापू कारंडे, नथू पाटील यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.


राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा: शेतकऱ्यांसाठी धोरणे अपयशी
Total Views: 34