देश विदेश

Raju Shetty warns......पंचगंगा नदीवर भरावामुळे पूराचा धोका – राजू शेट्टी यांचा इशारा

Raju Shetty warns


By nisha patil - 7/7/2025 1:26:33 PM
Share This News:



पंचगंगा नदीवर भरावामुळे पूराचा धोका – राजू शेट्टी यांचा इशारा

माणगांव (प्रतिनिधी): नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गातील माणगांव ते पट्टणकोडोली दरम्यान पंचगंगा नदीवर होणाऱ्या भरावामुळे कोल्हापूर शहरासह माणगांव, शिरोली, गांधीनगर आणि आजूबाजूच्या गावांना पूराचा गंभीर धोका निर्माण होणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

शेट्टी यांनी बाधित शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. ते म्हणाले की, भरावामुळे पाणी निचरा अडल्याने शेती, साखर उद्योग आणि शहरातील व्यवसाय धोक्यात येतील. हजारो एकर जमीन क्षारपड होण्याची शक्यता आहे.

शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.


Raju Shetty warns....पंचगंगा नदीवर भरावामुळे पूराचा धोका – राजू शेट्टी यांचा इशारा
Total Views: 126