बातम्या

राज्यभर चक्काजामचा राजू शेट्टींचा इशारा! 

Raju Shetty warns of state wide strike


By nisha patil - 12/6/2025 8:53:44 PM
Share This News:



राज्यभर चक्काजामचा राजू शेट्टींचा इशारा! 

 बच्चू कडूंच्या उपोषणाला पाठिंबा, शेट्टींनी दिला सरकारला अल्टीमेटम

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे आता दुःखद नव्हे तर रुदनाचे कारण बनले आहे. दररोज आठ शेतकरी आयुष्य संपवत असताना, राज्य सरकार निवडणुकीतील कर्जमाफीचे आश्वासन पाळण्यात अपयशी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मोझरी येथे शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवताना शेट्टी बोलत होते. उपोषणाला पाच दिवस झाले असून सरकारचे दुर्लक्ष अद्यापही कायम आहे. सोयाबीन उत्पादकांचे १५ हजार कोटींचे नुकसान, ऊस उत्पादकांचे ५ हजार कोटी एफ.आर.पी थकीत, तर कांदा-डाळिंब-द्राक्ष उत्पादक संकटात आहेत.

राज्याच्या विविध भागांतील मंत्री दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्या थांबवून त्यांना प्रश्न विचारण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. सर्व संघटनांचे नेते, मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दोन दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
 


राज्यभर चक्काजामचा राजू शेट्टींचा इशारा! 
Total Views: 86