राजकीय
राजू शेट्टी यांची महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनला सदिच्छा भेट; शेतकरी हिताच्या उपक्रमांवर चर्चा
By nisha patil - 5/28/2026 11:06:25 AM
Share This News:
राजू शेट्टी यांची महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनला सदिच्छा भेट; शेतकरी हिताच्या उपक्रमांवर चर्चा
मुदाळ तिट्ठा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या मुदाळ तिट्ठा येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
राजू शेट्टी यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. युवराज रामचंद्र येडूरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) आधारित विविध उपक्रमांची माहिती घेतली. शेतकरी, विद्यार्थी तसेच समाजहितासाठी सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी डॉ. युवराज येडूरे यांनी महाराष्ट्रातील शेतकरी हितासाठी तयार करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती राजू शेट्टी यांना दिली. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेली संकल्पना व कार्यआराखडा पाहून शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्रम राज्यभर प्रभावीपणे राबविल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भेटीदरम्यान CSR निधीच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या सहकार्याने शेतकरी हिताचे अधिक व्यापक प्रकल्प राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या काळात शेतकऱ्यांच्या विकासासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
भेटीच्या शेवटी संस्थेच्या वतीने राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देत पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले. त्यानंतर ते आपल्या पुढील शेतकरी हिताच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.
या प्रसंगी महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
राजू शेट्टी यांची महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनला सदिच्छा भेट; शेतकरी हिताच्या उपक्रमांवर चर्चा
|