बातम्या

नांदणी हत्तीप्रकरणात पेटावर राजू शेट्टींचा सवाल...

Raju Shettys question on the stomach in the Nandani elephant case


By nisha patil - 1/8/2025 4:04:01 PM
Share This News:



नांदणी हत्तीप्रकरणात पेटावर राजू शेट्टींचा सवाल...

वनतारा प्रकरणाचा खुलासा मागितला

नांदणी मठामध्ये साखळदंडाने ३३ वर्षे बांधून ठेवण्यात आलेल्या महादेवी हत्तीच्या पायाला गंभीर जखमा झाल्याचा आरोप प्राणीमित्र संघटना पेटा (PETA) कडून करण्यात आला आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पेटाच्या भूमिकेवर जोरदार प्रश्न उपस्थित केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, “खालील फोटोत दिसणारा हत्ती अंबानी कुटुंबाच्या ‘वनतारा’ प्रकल्पात उभा असलेला आहे. या हत्तीच्या पायालाही साखळदंड आहे. मग हे हत्ती मुक्त संचार कसे करतात? अशा प्रकारचा दुजाभाव कशाच्या आधारे केला जातो? याचा खुलासा पेटाने करावा.”

त्याचबरोबर, अंबानी कुटुंबाच्या विविध कार्यक्रमांत वनतारा प्रकल्पातील हत्ती राजरोसपणे कसे वापरले जातात? यासाठी कोणते कायदेशीर परवाने घेण्यात आले आहेत? यावरही शंका व्यक्त करण्यात आली आहे. “नांदणी मठावर टीका करणाऱ्यांनी वनतारामधील प्रकरणांची देखील चौकशी करावी,” अशी मागणी राजू शेट्टींनी केली.

शेट्टी यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत म्हटले की, “आजपर्यंत वनतारा प्रकल्पात एकूण किती हत्ती किंवा इतर प्राणी आणले गेले, त्यातील किती दगावले आणि सध्या किती जिवंत आहेत, याचा संपूर्ण लेखा-जोखा संबंधित अधिकाऱ्यांनी नांदणी मठामध्ये खुला करावा.”


नांदणी हत्तीप्रकरणात पेटावर राजू शेट्टींचा सवाल...
Total Views: 175