राजकीय

महात्मा फुले सूतगिरणीच्या अध्यक्षपदी राजूबाबा आवळे यांची बिनविरोध निवड

Rajubaba Awale elected unopposed as the chairman of Mahatma Phule Sootgirani


By nisha patil - 6/15/2025 11:53:49 PM
Share This News:



महात्मा फुले सूतगिरणीच्या अध्यक्षपदी राजूबाबा आवळे यांची बिनविरोध निवड

उपाध्यक्षपदी महादेव दबडे; संचालक मंडळाची निवड बिनविरोध पूर्ण

महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी,  अध्यक्षपदी माजी आमदार राजूबाबा जयवंतराव आवळे, तर उपाध्यक्षपदी महादेव दत्तात्रय दबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक आणि माजी मंत्री जयवंतराव गंगाराम आवळे होते.

सूतगिरणीच्या २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये सर्व संचालकांची बिनविरोध निवड झाली. निवड झालेल्या संचालकांची नावे पुढीलप्रमाणे:

 जयवंतराव गंगाराम आवळे, संजय जयवंतराव आवळे, राजूबाबा जयवंतराव आवळे, महादेव दत्तात्रय दबडे, विष्णू शंकर माते, वारसवंत तालिम आवळे, दयानंद लगमान्ना कांबळे, महिपती शंकर दबडे, अमोल केरू कांबळे, धोंडिराम बंडू सोळंकर, सूरज रतन शिंदे, संजय गणपती भोरे, मालती रामचंद्र लोखंडे, लक्ष्मी प्रकाश मोरे, जयश्री शिवाजी सोलगे, रशीद बाबासाहेब शेख, अमर शशिकांत मंदारे.

या निवडणुकीसाठी वस्त्रोद्योग विभाग सोलापूर येथील प्रादेशिक उपायुक्त उज्वला पळसकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांना सहाय्यक अधिकारी मल्लाप्पा नरोटे आणि मकरंद कुलकर्णी यांनी सहाय्य केले.


महात्मा फुले सूतगिरणीच्या अध्यक्षपदी राजूबाबा आवळे यांची बिनविरोध निवड
Total Views: 81