विशेष बातम्या
ऑन ड्युटी 24 तास कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राखी उपक्रम
By nisha patil - 8/8/2025 2:49:58 PM
Share This News:
ऑन ड्युटी 24 तास कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राखी उपक्रम
भागीरथी महिला संस्थेने सलग १७व्या वर्षी जपला स्नेहबंध..
कोल्हापूरातील सहा पोलिस ठाण्यांमध्ये राखी बांधून कृतज्ञतेचा संदेश
कोल्हापुरात भागीरथी महिला संस्थेच्या वतीने सलग १७व्या वर्षी पोलिस कर्मचार्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सोहळा साजरा करण्यात आला.
पोलिसांना कुटुंबापासून दूर राहूनही २४ तास कर्तव्य बजावावे लागते. यामुळे या उपक्रमातून त्यांच्याबद्दल स्नेह व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
जुना राजवाडा, लक्ष्मीपूरी, शाहूपुरी, राजारामपूरी, करवीर आणि गांधीनगर अशा सहा पोलिस ठाण्यांमध्ये महिला सदस्यांनी औक्षण करून राखी बांधली.
गांधीनगरमध्ये कामानिमित्त आलेल्या दोन कर्नाटकातील पोलिसांनाही राखी बांधण्यात आली, ज्यामुळे तेही भावूक झाले.
ऑन ड्युटी 24 तास कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राखी उपक्रम
|