शैक्षणिक
प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा;
By nisha patil - 5/8/2025 5:40:42 PM
Share This News:
प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा;
जवानांसाठी 230 देशभक्त राख्या तयार
144 वर्षांची परंपरा असलेल्या प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथे सोमवार, 4 ऑगस्ट रोजी सीमेवरील जवानांसाठी राखी बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. एनसीसी एअर विंग्स, बटालियन व आरएसपीच्या 113 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
विद्यार्थिनींनी घरी उपलब्ध वस्तूंमधून एकूण 230 आकर्षक राख्या तयार केल्या. तिरंगी रंगाच्या राख्यांचे विशेष आकर्षण होते. सर्व राख्या जवानांकडे पाठवण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक गिरीश जांभळीकर व त्यांच्या टीमचे विशेष मार्गदर्शन लाभले.
प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा;
|