शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये राखी तयार करणे कार्यशाळा संपन्न.
By nisha patil - 7/24/2025 12:16:10 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये राखी तयार करणे कार्यशाळा संपन्न.
कोल्हापूर : विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथील गृहविज्ञान विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राखी तयार करणे कार्यशाळेत मा.सौ. रेखा मलाबादे यांनी विविध प्रकारच्या राख्या बनविण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यामध्ये क्रिस्टल राखी, लोकरी फुलांची राखी, नथ फुल राखी असे राख्यांचे अनेक प्रकार विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले .आय क्यू ए सी समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी उद्घाटन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मानवी बुद्धिमत्ता व कौशल्य यांचे जीवनातील महत्त्व विशद केले. कार्यशाळे करिता महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.आर. आर. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ.उर्मिला खोत यांनी केले.आभार श्रीमती योगिता पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीमती सई पाटील यांनी केले. कार्यशाळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये राखी तयार करणे कार्यशाळा संपन्न.
|