शैक्षणिक
बालकल्याण संकुल येथे रक्षाबंधन
By nisha patil - 12/8/2025 4:51:49 PM
Share This News:
बालकल्याण संकुल येथे रक्षाबंधन
कोल्हापूर दि. 12: येथील विवेकानंद महाविद्यालयातील ज्युनिअर व सिनिअर एन.एस.एस. विभागामार्फत बालकल्याण संकुल, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी एन.एस.एस. मधील मुलींनी बालकल्याण संकुलातील मुलांना राख्या बांधून व पेढा भरवून भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन सण साजरा केला.
याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा.पी आर बागडे, डॉ.अभिजीत पाटील, प्रा. सौ. शुभांगी पाटील,प्रा.सौ एम के पोवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी 50 विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होते. कार्यक्रमाचे आयोजन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.एस.के.धनवडे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
बालकल्याण संकुल येथे रक्षाबंधन
|