बातम्या

समाज गौरव पुरस्कार २०२५ ने राम मोहन कारंडे सन्मानित...

Ram Mohan Karande honored with Samaj Gaurav Award 2025


By nisha patil - 12/17/2025 3:39:34 PM
Share This News:



समाज गौरव पुरस्कार २०२५ ने राम मोहन कारंडे सन्मानित...

सायकल वेडे कोल्हापूरची ऐतिहासिक मोहिम, तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश

फिटनेस आयकॉन अक्षयकुमार फॅन्स क्लब संचलित सायकल वेडे कोल्हापूर या संस्थेच्या वतीने अध्यक्ष राम मोहन कारंडे यांच्या संकल्पनेतून एक ऐतिहासिक सायकल मोहिम राबवण्यात आली. पुणे–पिंपरी चिंचवड येथील मोशी येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच, १४० फूट उंच छत्रपती संभाजी महाराज स्मारकास मानवंदना देण्यासाठी कोल्हापूरचे ध्येयवेडे सायकलपटू राम कारंडे, अंकुश पाटील, रोहित बागडी आणि भगवान शिंगाडे यांनी तब्बल ३०१ किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला.

या मोहिमेद्वारे गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण थांबवावे, प्लास्टिकमुक्त भारत घडवावा, सायकल चालवून निरोगी राहावे, असा सामाजिक संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक भोसरीचे आमदार महेश लांडगे तसेच मोशी परिसरातील नागरिकांनी केले.

कोल्हापूरसह राज्यभर या मोहिमेचे अभिनंदन होत असून, अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये सायकलिंगकडे ओढ वाढत असल्याचे चित्र आहे. या सामाजिक व प्रेरणादायी कार्याची दखल घेत राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीने समाज गौरव पुरस्कार २०२५ देऊन सायकल वेडे कोल्हापूरचे अध्यक्ष राम मोहन कारंडे यांचा सन्मान करण्यात आला.


समाज गौरव पुरस्कार २०२५ ने राम मोहन कारंडे सन्मानित...
Total Views: 56