विशेष बातम्या

पंतप्रधान मोदींसह राज्यातील मान्यवरांच्या यादीत रणजीत खाशाबा जाधव...

Ranjit Khashaba Jadhav is among


By nisha patil - 8/13/2025 3:01:20 PM
Share This News:



पंतप्रधान मोदींसह राज्यातील मान्यवरांच्या यादीत रणजीत खाशाबा जाधव...

खाशाबा जाधव यांच्या वारशाचा गौरव...

भारताचे पहिले ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचा वारसा पुढे नेताना रणजीत खाशाबा जाधव यांचे नाव थेट देशाच्या आणि राज्याच्या मान्यवरांच्या कार्यक्रमपत्रिकेत झळकले आहे.

या कार्यक्रमपत्रिकेत भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कौशल्य, उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची नावे असून, त्यात रणजीत खाशाबा जाधव यांचे नाव झळकल्याने ते स्वतःला अभिमान व समाधानाची भावना व्यक्त करत आहेत.

“पिताश्रींच्या ऑलिम्पिक कर्तबगारीमुळे आज ही सन्मानाची वेळ आली, हा माझ्यासाठी प्रेरणादायी क्षण आहे,” असे रणजीत खाशाबा जाधव यांनी सांगितले.


पंतप्रधान मोदींसह राज्यातील मान्यवरांच्या यादीत रणजीत खाशाबा जाधव...
Total Views: 69