बातम्या
राष्ट्रीय किसान मोर्चाची भूदरगड (गारगोटी) येथे बैठक संपन्न
By nisha patil - 8/6/2026 1:14:57 PM
Share This News:
राष्ट्रीय किसान मोर्चाची भूदरगड (गारगोटी) येथे बैठक संपन्न
आजरा(हसन तकीलदार) रविवार 7 जून 2026 रोजी राष्ट्रीय किसान मोर्चाची भुदरगड येथे बैठक संपन्न झाली याबैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्याबाबत चर्चा करण्यात आली.आणि यासाठी लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मागणी करण्याचे ठरले
यामध्ये प्रमुख्याने शेतकऱ्याच्या उत्पादनाला हमी भाव मिळावा. कोल्हापूर जिल्हातील 78 गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध.वन्य प्राण्यांचा वाघ ,बिबटे, गवे, हत्ती शेतकऱ्यांना होणारा त्रास यावर उपाय योजनाबाबत
या विषयावर विविध मान्यवरांनी या समस्या सोडवण्यासांठी राष्ट्रीय किसान मोर्चाची शेतकरी परिषद आयोजित करून शेतकऱ्यांच्या माध्यमातून जनआंदोलन उभा करण्यात यावे असे आपले म्हणणे मांडले .
या बैठकीमध्येमध्ये विविध भागातून कार्यकर्ते आले होते.सुरेश थोरात,डॉ. उल्हास त्रिरत्ने,महेश बावडेकर, राहूल कांबळे, अचलकुमार अंबेकर, सौरव देसाई, डी . एम . कांबळे, मनोज कांबळे, निता आदित्य, सुजाता कांबळे, मोहन शिर्के,शहाजी सुभेदार, कृष्णात पाटील, आदित्य विजय, व्ही.जी. कांबळे , शरद पाटील,धनंजय धर्मरक्षी,अरूण पाटील,आनंदा हुजरे, संजय वर्धन,राहूल मोरे,बाबासाहेब कांबळे, अजय कांबळे,दशरथ कांबळे, हिंदुराव कांबळे,ब्रिजेश सरनाईक, ॲड. सुनिल नागदिवे ,सागर सुतार आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते .
राष्ट्रीय किसान मोर्चाची भूदरगड (गारगोटी) येथे बैठक संपन्न
|