राजकीय
राष्ट्रीय स्वराज्य सेना स्वबळावर निवडणुका लढवणार-ऍड. श्रीहरी बागल
By nisha patil - 3/11/2025 11:26:29 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वराज्य सेनेने 16 ठिकाणी बासरी या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इ. महानगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी कोर कमिटी, पदाधिकारी व कार्यकर्त्यानी निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. श्रीहरी बागल यांनी दिली आहे.
राष्ट्रीय स्वराज्य सेनेची मुंबई येथे नुकतीच कोर कमिटी, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यामध्ये प्रामुख्याने जनतेच्या मागणीला अनुसरून मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मागील विधानसभेला राष्ट्रीय स्वराज्य सेनेने बृहन्मुंबई विभागात 16ठिकाणी विधानसभा निवडणूक बासरी चिन्हावर लढवली होती.
म्हणून आता कोणतीही युती अथवा आघाडी न करता स्वबळावर महानगरपालिका निवडणुका लढवणार असून त्यासाठी बासरी हेच चिन्ह मिळावे अशी लेखी मागणी राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. असे राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. श्रीहरी बागल यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वराज्य सेना स्वबळावर निवडणुका लढवणार-ऍड. श्रीहरी बागल
|