राजकीय
करनूरमध्ये समरजित घाटगे गटाला खिंडार — प्रमुख कार्यकर्त्यांचा मुश्रीफ गटात प्रवेश
By nisha patil - 12/10/2025 9:55:22 PM
Share This News:
करनूरमध्ये समरजित घाटगे गटाला खिंडार — प्रमुख कार्यकर्त्यांचा मुश्रीफ गटात प्रवेश
कागल, दि. १२ :करनूर (ता. कागल) येथील समरजित घाटगे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटात प्रवेश केला.
यामध्ये सतीश धनगर, विठ्ठल धनगर, गणपती धनगर, बाळू धनगर, सोमा धनगर, कृष्णात धनगर, रामा धनगर आदींचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांनी घाटगे गटाच्या कारभाराला कंटाळून मुश्रीफ गटाचा स्वीकार केला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. “या सर्वांचा मान राखला जाईल,” असे त्यांनी सांगितले.
या वेळी रंगराव पाटील, वजीर नायकवडी, महमद शेख, रावसाहेब चौगुले, तानाजी कुंभार, प्रवीण कुमार कर्णिक, संभाजी पाटील, सौ. संगीता जगदाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
करनूरमध्ये समरजित घाटगे गटाला खिंडार — प्रमुख कार्यकर्त्यांचा मुश्रीफ गटात प्रवेश
|