बातम्या

रद्दी विक्रीसाठी 10 मे पर्यंत दरपत्रके सादर करावीत

Rates for scrap sale should be submitted by May 10th


By nisha patil - 6/5/2025 5:19:32 PM
Share This News:



रद्दी विक्रीसाठी 10 मे पर्यंत दरपत्रके सादर करावीत

कोल्हापूर, : जिल्हा माहिती कार्यालयातील वर्तमानपत्रांची रद्दी विकण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत असून इच्छुकांनी दरपत्रक सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूरच्यावतीने करण्यात आले आहे. 
     
जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी (मराठी व इंग्रजी) तसेच इतर साहित्य पाहण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध आहेत.  तरी इच्छुकांनी आपली दरपत्रक जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे दिनांक 10 मे 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत. 


रद्दी विक्रीसाठी 10 मे पर्यंत दरपत्रके सादर करावीत
Total Views: 108