विशेष बातम्या
शिरोलीत राठोड ज्वेलर्स कंपनीचे उद्घाटन — उद्योगवाढीला नवे बळ
By nisha patil - 10/27/2025 2:41:29 PM
Share This News:
शिरोलीत राठोड ज्वेलर्स कंपनीचे उद्घाटन — उद्योगवाढीला नवे बळ
“स्थानिक रोजगार आणि आर्थिक प्रगतीसाठी अशा उद्योगांची उभारणी कौतुकास्पद”
शिरोली (ता. हातकणंगले), दि. २६ ऑक्टोबर २०२५ : शिरोली येथे राठोड ज्वेलर्स कंपनीच्या नव्या शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. हा उपक्रम जिल्ह्यातील उद्योगवाढ, व्यापारी क्षेत्र आणि स्थानिक रोजगारनिर्मितीसाठी सकारात्मक पाऊल ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
उद्घाटन प्रसंगी उपस्थितांनी गोल्ड ज्वेलरी निर्मिती कारखान्याची पाहणी करून उत्पादन प्रक्रियेमधील कौशल्य, गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाचा आढावा घेतला. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीसाठी अशा उद्योगांची उभारणी कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या सोहळ्याला राठोड ज्वेलर्सचे प्रमुख श्री. हंजारीमल राठोड, श्री. चंद्रकांत राठोड, श्री. हृदय राठोड, सौ. विवा राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, आणि आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
शिरोलीत राठोड ज्वेलर्स कंपनीचे उद्घाटन — उद्योगवाढीला नवे बळ
|