बातम्या

*रवळनाथ पतसंस्थेकडून कर्मचाऱ्यांना १६ टक्के बोनसची दिवाळी भेट

Rawalnath Credit Society gives 16


By nisha patil - 10/31/2026 9:20:24 PM
Share This News:



*रवळनाथ पतसंस्थेकडून कर्मचाऱ्यांना १६ टक्के बोनसची दिवाळी भेट
 

*दोन पगारांसह फराळ व दिवाळी साहित्याचे वाटप; संस्थेच्या ठेवी २७ कोटींच्या पुढे
 

*आजरा(हसन तकीलदार) श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, आजरा यांच्या वतीने दिवाळीनिमित्त संस्थेतील कर्मचाऱ्यांना १६ टक्के बोनस म्हणजेच दोन पगारांची रक्कम देण्यात आली. याशिवाय दिवाळी फराळ आणि आवश्यक साहित्याचेही वाटप करण्यात आले. संस्थेच्या या निर्णयामुळे कर्मचारीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा आणि संस्थेच्या प्रगतीतील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून दरवर्षी दिवाळीनिमित्त बोनस दिला जातो. यंदाही संस्थेने १६ टक्के बोनस देत कर्मचाऱ्यांना दोन पगारांची भेट दिली आहे. त्याचबरोबर दिवाळी फराळ आणि साहित्य देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला आहे.
यावेळी संस्थेचे चेअरमन अभिषेक शिंपी यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती देताना संस्थेच्या ठेवी २७ कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे सांगितले. सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास तसेच संचालक मंडळ आणि कर्मचारीवर्गाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संस्थेची आर्थिक वाटचाल अधिक भक्कम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

यावेळी व्हा. चेअरमन समीर गुंजाटी, संचालक माजिद मुराद, युसुफ गवसेकर, विक्रम पटेकर, किरण कांबळे, इब्राहिम इंचनाळकर, विलास कुंभार, विश्वास जाधव, सुधीर नार्वेकर, सौ. अर्चना मराठे, सौ. माधुरी पाचवडेकर व व्यवस्थापक विश्वास हरेर उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक पाठबळ देण्याच्या संस्थेच्या या निर्णयाचे कर्मचारीवर्गातून स्वागत होत आहे.


*रवळनाथ पतसंस्थेकडून कर्मचाऱ्यांना १६ टक्के बोनसची दिवाळी भेट
Total Views: 198