बातम्या

आजऱ्यात रवळनाथ मंदिरात अष्टमीच्या दिवशी डोक्यावरील जागर आरती

Rawalnath Temple


By nisha patil - 2/10/2025 11:19:38 AM
Share This News:



आजरा (हसन तकीलदार) : आजऱ्याचे ग्रामदैवत श्री रवळनाथाच्या मंदिरात अष्टमीच्या दिवशी पारंपरिक डोक्यावरील जागर आरती मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सोहळा भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे.

या आगळ्या-वेगळ्या आरतीसोहळ्यात गुरव परंपरेनुसार प्रथम डोक्यावरील सर्व केस कापले जातात. त्यानंतर गुरवांच्या डोक्यावर ताम्हण ठेवून त्यामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो. हा दिवा मंदिराभोवती चांगभलच्या गजरात प्रदक्षिणा घालत नेला जातो. यावेळी शस्त्रास्त्रांसह मानकरी गुरवांच्या पाठीशी चालत असतात.

पूर्वी या आरतीदरम्यान अपघाताने डोक्यावरून दिवा पडून शिरच्छेद होण्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात. त्यामुळे आजही हा सोहळा उत्कंठा, श्रद्धा आणि भक्तीचा परमोच्च क्षण मानला जातो.

रवळनाथ मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असून, या डोक्यावरील जागर आरतीचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरहून भाविक उपस्थित राहतात.


आजऱ्यात रवळनाथ मंदिरात अष्टमीच्या दिवशी डोक्यावरील जागर आरती
Total Views: 89